कणकवली कॉलेजची मिताली पराष्ष्टेकर युवा संवाद स्पर्धेमध्ये प्रथम

⚡कणकवली ता.१२-: राष्ट्रीय सेवा योजना विभाग, मुंबई विद्यापीठ आणि कणकवली कॉलेज, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्हा अंतर्गत “युवा संवाद-2023” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. केंद्र सरकार निर्देशित “मेरी मिट्टी मेरा देश” या अभियान अंतर्गत ‘पंचप्रण’ या संकल्पनेवर आधारित “युवा संवाद-2023” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या
या स्पर्धेमध्ये जिल्हाभरातून विविध राष्ट्रीय सेवा योजना विभागातील 30 स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. यामध्ये मिताली पराष्ष्टेकर, कणकवली कॉलेज, प्रज्ञा साळवी, दळवी महाविद्यालय, दिनेश सैनी, संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ यांनी क्रमशः प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावला सदर विद्यार्थ्यांची निवड विद्यापीठ स्तरीय स्पर्धेसाठी करण्यात आली. तसेच सायमा पटेल, सलोनी कदम कणकवली कॉलेज, कणकवली, वैष्णवी वराडकर यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी, सावंतवाडी सोनल गवस या स्वयंसेवकांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला. सदर स्पर्धेचे आयोजन कणकवली कॉलेज प्राचार्य प्रा. युवराज महालिंगे, मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग विशेष कार्य अधिकारी प्रा. सुशील शिंदे, कार्यक्रम अधिकारी रमेश देवकर, सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक प्रा. वसीम सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली कॉलेज राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेश पाटील, प्रा सागर गावडे, प्रा. पूजा मुंज, प्रा. अदिती मालपेकर, प्रा. प्रवीण कडूकर यांनी केले सदर स्पर्धेसाठी परीक्षण प्रा. स्वीटी जाधव यांनी केले. प्रसंगी चाळीस स्वयंसेवक व प्राध्यापक उपस्थित होते.

You cannot copy content of this page