चाकरमान्यांची लूट रोखण्यासाठी खासगी गाड्यांचे दर निश्चित

दीडपट पेक्षा अधिक भाडे आकरल्यास संपर्क साधा:नंदकिशोर काळे यांचे आवाहन

⚡दोडामार्ग,ता.१२-: गणेशोत्सवासाठी खासगी गाड्यांमधून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची ट्रॅव्हल्स कंपन्या आणि एजंट आर्थिक लूट करत असतात.त्यामुळे त्यांना चाप लावण्यासाठी सिंधुदुर्ग आरटीओने खासगी गाड्यांचे तिकीट दर निश्चित केले आहेत. एसटी आकारत असलेल्या प्रवास भाड्यापेक्षा ५० टक्के अधिक भाडे आकारण्यास त्यांना मुभा दिली आहे.त्यापेक्षा अधिक भाडे आकारल्याची तक्रार प्रवाशांनी केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचा इशारा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांनी दिला आहे.


त्यांनी परिपत्रकात एसटीचे साध्या,शिवशाही आणि स्लीपर गाड्यांचे प्रवासभाडे दिले आहे.त्यात जास्तीत जास्त ५० टक्के वाढ खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या अथवा एजंट करु शकतात.मात्र दीडपट पेक्षा अधिक प्रवासभाडे आकारल्यास कारवाई अटळ आहे.

एसटी प्रवासभाडे खालीलप्रमाणे:(साधी,शिवशाही,स्लीपर या क्रमाने)

मुंबई – सावंतवाडी – ७५०/१११५/११०५
मुंबई – कुडाळ –
७२५/१०७५/१०७०
मुंबई – कणकवली –
६७०/९८५/९८०
मुंबई – मालवण – ७३०/१०८५/१०८०
मुंबई – वेंगुर्ले –
७६०/११२५/११२०
मुंबई – देवगड –
७०५/१०५०/१०४०
पुणे स्टेशन – सावंतवाडी –
५८५/८७०/८६०
पुणे स्टेशन – कुडाळ –
५६०/८३०/८२५
पुणे स्टेशन – कणकवली –
५०५/७५०/७४५
पुणे स्टेशन – मालवण –
६००/८९५/८९०
पुणे स्टेशन – वेंगुर्ले –
५९५/८८०/८७५
पुणे स्टेशन – देवगड –
५६०/८३०/८२५

दीडपट पेक्षा अधिक भाडे कुणी आकारत असेल तर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे (९८२२८४२३३३) वरिष्ठ लिपिक कालिदास झणझणे (९८१९२७०२०९) यांच्याशी संपर्क साधण्याचे आणि dyrto.07-mh@gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदविण्याचे आवाहन श्री.काळे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page