⚡सावंतवाडी ता.१२-: जिल्ह्या स्तरावर मिलाग्रिस हायस्कूल सावंतवाडी या प्रशालेतील खालील विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारात सुयश संपादन केले.
१)कु . श्रीया अतुल नाखरे (१७ वर्षांखालील गट) हिची रायफल शूटिंग मध्ये प्रथम क्रमांक मिळवून विभाग स्तरावर निवड झाली.
२) कु . परशुराम तानाजी जाधव (१४ वर्षांखालील गट) याची पिस्तूल प्रकारात प्रथम क्रमांक मिळवून विभाग स्तरावर निवड झाली.
३) कु . वैभवी धुरी (१७ वर्षांखालील गट) ज्यूडो प्रकारात प्रथम क्रमांक मिळवून विभाग स्तरावर निवड.
४) कु . अवनी भांगले (१४ वर्षांखालील गट) पिस्तूल प्रकारात द्वितीय क्रमांक.
५) कु . श्रीराम चव्हाण याने पीप साईट प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला.
६)कु . साहिल शिखरे व कु . यश कुडव (१७ वर्षांखालील गट) यांनी ज्यूडो प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला.
तर जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलींच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळविला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षिका शेरॉन अल्फान्सो यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनी अभिनंदन केले.यावेळी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल, पर्यवेक्षिका सौ. मेघना राऊळ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
