⚡कणकवली ता.१२-: महात्मा गांधी विद्यालय श्रावण नंबर 1 तालुका मालवण या शाळेत शाळास्तरीय तृणधान्य पाककृती स्पर्धा झाली. या स्पर्धेत एकूण 23 स्पर्धक सहभागी झाले होते. या तृणधान्य पाककृती स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेत पुरुष स्पर्धक ही सहभागी झाले होते. तर श्रावण गावातील महादेव लक्ष्मण पवार व हरि विश्राम पवार उर्फ अण्णा पवार हे 68 वर्षाचे वृद्ध सुद्धा स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते.
या स्पर्धेचे उद्घाटन नाचणीचा केक कापून व पाककृती हॉलची फीत कापून सरपंच नम्रता मुद्राळे यांनी केले. तर दीपप्रज्वलन उपसरपंच दुलाजी परब यांच्या हस्ते झाले. यावेळी ग्रामपंचायत श्रावणचे सदस्य रागिनी पवार, हर्षदा चव्हाण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवराम परब, शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षण प्रेमी सदस्य उमेश श्रावणकर, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष संगीता वेदरे, माता पालक संघाचे उपाध्यक्ष पायल परब, ग्रामपंचायत कर्मचारी संदीप उर्फ बापू परब, देणगीदार प्रकाश बागवे, पालक संघाचे सदस्य सुरेंद्र परब आणि परीक्षक सोमनाथ शेंगाळ व राजेश भिरवंडेकर हे उपस्थित होते. सुरुवातीला स्पर्धेच्या निकषांबाबत सोमनाथ शेंगाळ आणि राजेश भिरवंडेकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर उपसरपंच दुलाजी परब यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर पाककृती स्पर्धेला सुरुवात झाली. एकूण ५ नियमांवर ५० गुणांवर परीक्षण करण्यात आले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक वरईचा पुलाव नुतन तुषार श्रावणकर, द्वितीय क्रमांक नाचणीची गुळपापडी अर्चना सुनील लाड तर तृतीय क्रमांक बाजरीचे वडे चटणी नम्रता नागेश परब यांनी मिळवला. या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षण प्रेमी सदस्य उमेश श्रावणकर यांच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यानंतर परीक्षक सोमनाथ शेंगाळ मुख्याध्यापक शाळा किर्लोस आंबवणे, तर राजेश भिरवंडेकर पदवीधर शिक्षक शाळा राठीवडे नंबर 1 यांना सरपंच आणि उपसरपंच यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ, माता पालक संघ, ग्रामपंचायत श्रावण, ग्रामस्थ व गावातील अंगणवाडी सेविका व मदतनीस या सर्वांनी कठोर मेहनत घेतली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व स्पर्धा प्रमुख म्हणून पदवीधर शिक्षक शमा कडुलकर यांनी काम पाहिले. त्यांना सहकार्य मुख्याध्यापक स्मिता किंजवडेकर, शिक्षक विनायक हरकुळकर, अमित पवार, रोहिणी पवार, सुवर्णा दळवी आणि सर्व विद्यार्थ्यांनी केले. आभार विनायक हरकुळकर यांनी मानले.
