हीरक महोत्सवी कार्यक्रम नियोजनासाठी आयोजन
बांदा/प्रतिनिधी
परब मराठा समाज मंडळाच्या स्थापनेला ६० वर्षे पूर्ण होत असल्याने यावर्षी २२, २३ व २४ डिसेंबर रोजी कणकवली येथे हिरक महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या नियोजनासाठी २४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता कुडाळ येथील सावंतवाडी मराठा समाज हॉल मध्ये परब समाजाची मुंबई कार्यकारिणी व सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी तसेच समाज बांधव यांची एकत्रित नियोजन बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत हिरक महोत्सवाचे नियोजन करण्यात येणार आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहात महोत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षी हिरक महोत्सवी वर्ष असल्याने मोठ्या दिमाखात व राज्यस्तरीय मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे. नियोजन बैठकीसाठी समाज बांधवानी उपस्थित राहण्याचे आवाहन परब मराठा समाजाचे जिल्हा संघटक विनायक परब यांनी केले आहे.
