बांदा प्रभाग क्रमांक ५ मध्ये मर्यादित घरगुती गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन…

साईप्रसाद काणेकर मित्रमंडळातर्फे खास गणेशउत्सव निमित्त पुढाकार;स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संपर्क करण्याची केले आवाहन…

बांदा/प्रतिनिधी
बांदा शिवसेना शहरप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर मित्रमंडळातर्फे खास गणेशोत्सवनिमित्त प्रभाग क्रमांक ५ मर्यादित घरगुती गणेश सजावट आणि गणेश मूर्ती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा प्रभाग पाच मधील हॉस्पिटल कट्टा, सुतारवाडी, काळसेवाडी, आंबेडकर नगर यांच्यासाठी मर्यादित आहे. गणेश आरास सजावट स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रोख ४ हजार ४४४ रुपये, द्वितीय पारितोषिक रोख २ हजार २२२ रुपये तर तृतीय पारितोषिक रोख १ हजार ५५५ रुपये ठेवण्यात आले आहेत. तर गणेश मूर्ती सजावट स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाला २ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १५०० रुपये तर तृतीय क्रमांकासाठी १ हजार रुपये पारितोषिक ठेवण्यात आले आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रशांत कोचरेकर (मो. ७७४५०७१७२१), विठ्ठल उर्फ भाऊ वाळके (मो. ७८८७५३८३८९) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन ग्रामपंचायत सदस्या सौ. देवल येडवे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page