दोडामार्ग तालुका विश्वकर्मा सुतार संघटनेचे शासनाला निवेदन
⚡दोडामार्ग ता.१२-: दोडामार्ग तालुका विश्वकर्मा सुतार संघटनेने येथील तहसीलदारांना निवेदन देऊन लोकशाही चॅनेलचे पत्रकार कमलेश सुतार यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे.
भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांची व्हिडीओ क्लिप व्हायरल प्रकरण गाजले होते.ती बातमी सर्वप्रथम प्रसारित करणाऱ्या लोकशाही चॅनलचे संपादक पत्रकार कमलेश सुतार यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यामुळे पत्रकारितेची पायमल्ली होते असे म्हणत सुतार ज्ञाती बांधवांनी दोडामार्ग तहसीलदार यांना निवेदन देत गुन्हे मागे घेण्याची विनंती केली, यावेळी विश्वकर्मा सुतार संघटनेचे अध्यक्ष नारायण सुतार, सल्लागार रामदास मेस्त्री,मधुसूदन सुतार, राजेश सुतार,अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
