नादुरुस्त रस्त्यावर स्वखर्चाने घातले काँक्रिट…

भटवाडी ग्रामस्थानी परशुराम चलवाडी यांचे मानले आभार:नागरिकांची अडचण दूर केल्याने व्यक्त केले समाधान…

⚡सावंतवाडी ता.१२-: येथील भटवाडी परिसरात रस्त्यात खड्डे झाल्याने नागरिकांचे हाल होत होते. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते परशुराम चलवाडी यांनी स्वखर्चातून रस्त्यावर कॉंक्रिट घालून हा रस्ता नागरिकांसाठी सुरक्षित करून दिला. त्यामुळे नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.

दरम्यान गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सध्या चाकरमानी मोठ्या प्रमाणात शहरात आता दाखल होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर चलवाडी यांनी पुढाकार घेत हा रस्ता नागरिकांसाठी व्यवस्थित करून दिला. त्यामुळे त्यांचे भटवाडी परिसरातील नागरिकांनी आभार मानून समाधान व्यक्त केले.

यावेळी नीलिमा चलवाडी, भारती परब, पुजा नायक, शिल्पा कांबळे आदी यावेळी उपस्थित होते.

You cannot copy content of this page