सफारी गाडीतून गोवा बनावट दारूची वाहतूक…

दोन आरोपिंसह साडे अकरा लाखांवर मुद्देमाल जप्त:जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाची ओसरगाव टोलनाका येथे कारवाई

⚡ओरोस ता.११-: आलिशान सफारी गाडीतून तीन लाख 70 हजाराची गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्गच्या पथकाकडून ११ लाख ६९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आज दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी ओसरगाव टोलनाका येथे ही कारवाई करण्यात आली आहे.

     स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण साळुंके, पोलीस हेड कॉन्स्टेबल  राजेंद्र जामसंडेकर, आशिष गंगावणे, प्रमोद काळसेकर, बत्याव डिसोझा, पोलीस नाईक आशिष जामदार, अमित तेली व पोलीस कॉन्स्टेबल यशवंत आरमारकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. या प्रकरणी  स्वप्निल उर्फ मुन्ना भिमराव वसेकर, वय 25 रा. टाकळी सिकंदर, उजनी कॉलनी, ता. मोहोळ जिल्हा- सोलापूर, शहाजी पठाण गायकवाड, वय-21, रा. टाकळी सिकंदर, भीमा सहकारी साखर कारखान्याजवळ, ता.मोहोळ जिल्हा-सोलापूर या दोघांना अटक करण्यात आली आहे. 

8 रुपये किमतीची सफारी गाडी आणि 3 लाख 69 हजार 600 किंमतीची गोवा बनावटीची दारु जप्त करण्यात आली आहे.


तसेच आरोपी विरुद्ध कणकवली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 (अ)(इ), 81,83 व मोटर वाहन कायदा कलम 3(1)/181, 139/177 अन्वये गुन्हा नोंद केलेला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, स्थानिक गुन्हा अन्वेषण पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page