२०२३ साठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केला सन्मान…
वैभववाडी संजय शेळके
वैभववाडी तालुक्यातील खांबाळे ग्रामपंचायत ग्रामसेवीका सौ नयना भागोजी गुरखे यांना सन 2023 साठी वैभववाडी तालुक्यातून आदर्श ग्रामसेविका पुरस्कार ओरस येथे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते समारंभ पूर्वक प्रधान करण्यात आला.
शासनाने ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे करून ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे राहणीमान उंचावण्यास व अडचणी सोडवण्यास सर्वतोपरी सहकार्य करणाऱ्या ग्रामसेवक यांना प्रोत्साहित करून त्यांचा गौरव करण्यात आला. सन 20 23 या वर्षाकरिता आदर्श ग्रामसेविका पुरस्कार साठी वैभववाडी तालुक्यातून नयना भागोजी गुरखे यांची निवड करण्यात आली आहे. नयना गुरखे अनेक वर्ष वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे व आता खांबाळे ग्रामपंचायत या दोन गावात ग्रामसेविका म्हणून काम पाहत आहेत. शरद कृषी भवन सिंधुदुर्ग येथे पुरस्कार प्रदान करताना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, आमदार निरंजन डावखरे, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अप्पर जिल्हा अधिकारी शंकर बर्गे, निवासी जिल्हा अधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, राजन तेली, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, राजू राऊळ, मुख्य लेखा वित्त अधिकारी वल्लरी गावडे, दादा साईल, गटविकास अधिकारी मालवण आप्पासाहेब गुजर, वैभववाडी जयप्रकाश परब, वासुदेव नाईक, विजय चव्हाण, अरुण चव्हाण, यांच्यासह असंख्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
