रत्नसिंधू योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कायापालट केला जाणार…

मंत्री दिपक केसरकर:शासनाचे बांधील आहोत याची जाणीव ठेवून योग्य काम करा;अधिकाऱ्यांना सुनवले खडे बोल…

⚡सावंतवाडी ता.११-: रत्नसिंधू योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कायापालट केला जाणार आहे यासाठी विविध विभागाअंतर्गत योजना राबवत त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे लवकरच यातून शेतकरी मच्छीमार बचत गट बागायतदार बेरोजगार तरुण-तरुण यांना फायदा होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली

तर आपण शासनाचे बांधील आहोत याची जाणीव ठेवून योग्य काम करा आणि ही तुमची नोंद शासन पातळीवर ठेवली जाईल असे खडे बोला ही मंत्री केसरकर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

सावंतवाडी नगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृह मंत्री केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली रत्नसिंधू योजनेची आढावा बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते त्यांच्यासोबत व्यासपीठावर अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे माजी आमदार प्रमोद जठार उपवनसंरक्षक एस नवकिशोर रेड्डी आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page