प्रमोद रावराणे उपाध्यक्ष, शारदा कांबळे चिटणीस:कार्यकारिणीत अनेकांना संधी..
वैभववाडी प्रतिनिधी
वैभववाडी तालुक्यातून भाजप जिल्हा कार्यकारणी मध्ये जिल्हा उपाध्यक्षपदी प्रमोद रावराणे तर सरचिटणीस पदी माजी समाज कल्याण सभापती शारदा कांबळे यांची निवड करण्यात आली आहे.
जिल्हा चिटणीस पदी भाजपच्या महिला तालुकाध्यक्ष प्राची तावडे कार्यकारी सदस्य पदी माजी सभापती अरविंदराव रावराणे, माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, भालचंद्र साठे, संजय रावराणे, तर निमंत्रक सदस्य पदी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र उर्फ राजा राणे यांची निवड करण्यात आली आहे.
