▪️मंत्री दीपक केसरकर;संजू परब यांच्या नगराध्यक्ष पदाच्या काळात उभारले होते सेल्फी पॉईंटच बांधकाम..
⚡सावंतवाडी ता.११-: येथील श्रीराम वाचन मंदिर समोरील ‘आय लव सावंतवाडी’ काढून त्या ठिकाणी खाऊगल्ली उभी करा, स्लॅब खालील बाजूस महिला बचतगटांच्या माध्यमातून ही खाऊ गल्ली उभी करण्याच्या सुचना शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले. श्री केसरकर आज येथील नगरपालिका आढावा बैठक घेतली यावेळी केसरकर यांनी मुख्याधिकाऱ्यांना सूचना केल्या.
गेली दोन वर्षे ‘आय लव्ह सावंतवाडी’ हा सेल्फी पॉईंट अपुर्ण अवस्थेत आहे. संजू परब यांच्या नगराध्यक्ष पदाच्या काळात ते उभारले गेले होते. हे सेल्फी पॉईंटच बांधकाम हटवून खाऊ गल्लीसाठी बैठक व्यवस्था करण्याचे आदेश दीपक केसरकर यांनी दिले आहेत.
