हत्तींचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी पावसाळ्यानंतर मोहीम राबविणार…

मंत्री दीपक केसरकर: वनविभागात विशेष बैठक संपन्न..

⚡सावंतवाडी ता.११-: हत्ती व वन्य प्राण्यांनी केलेल्या शेती बागायतीची नुकसान भरपाई वाढीव देण्याबाबत शासन प्रयत्नशील आहे लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल तर हत्तींचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी पावसाळ्यानंतर मोहीम राबवण्यात येईल अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली.

दोडामार्ग तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात हत्ती व वन्य प्राण्यांकडून शेती बागायतींचे होणारे नुकसान लक्षात घेता केसरकर यांनी आज येथील वनविभागाच्या कार्यालयात हत्ती हटाव समितीचे प्रमुख तसेच शेतकरी बांधवांसोबत वाढीव नुकसान भरपाई संदर्भात बैठक घेतली यावेळी उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

त्यांच्यासोबत व्यासपीठावर अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, उपवनसंरक्षक एस नवकिशोर रेड्डी, माजी आमदार राजन तेली, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर उपस्थित होते.

You cannot copy content of this page