प्लाॅट देतो असे सांगून काही जण आडाळी एमआयडीसीत व्यवसाय करण्यात पुढे…

दीपक केसरकर; मात्र हा प्रयत्न हाणून पाडू, राजन तेलीचे नाव न घेता टिका

⚡सावंतवाडी ता.१०-: प्लॉट देतो असे सांगून काही लोक आडाळी एमआयडीसीत व्यवसाय करू पाहत आहेत. मात्र त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडण्यात येईल, अशी टिका शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राजन तेली यांचे नाव न घेता लगावला. दरम्यान युवकांना रोजगार देण्यासाठी आडाळी एमआयडीसीत चांगले उद्योजक आणण्यात येथील असेही केसरकर यांनी यावेळी सांगितले. ते मळगाव येथील शालू हॉल मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी केसरकर पुढे बोलताना म्हणाले की भाजपने लॉंग मार्चमध्ये सहभाग घेतला मात्र या संदर्भात आम्ही वरिष्ठांची चर्चा केली, मात्र महायुतीत कोणतीही मतभेद होऊ नये यासाठी दक्षता घेण्याचे ठरले आहे असे देखील केसरकर यांनी यावेळी सांगितले.

तसेच केसरकर पुढे बोलताना म्हणाले की आमदार अपात्रितेचा निर्णय काय होईल हे सांगता येणार नाही मात्र दोन्ही गटाचे या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. काही निर्णय झाला तरी दोन्ही गट कोर्टात जातील असे मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी सांगितले.

You cannot copy content of this page