भाजपची जंबो जिल्हा कार्यकारिणी…

जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केली जाहीर:तब्बल १५० जणांचा समावेश

⚡ओरोस ता.१०-: गेल्या महिन्यात भाजपा जिल्हाध्यक्ष पदी प्रभाकर सावंत यांची नियुक्ती झाल्यानंतर प्रतीक्षेत असलेल्या भाजपाच्या जंबो जिल्हा कार्यकारिणीची घोषणा आज जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केली. 4 सरचिटणीस,10 उपाध्यक्ष, 10 चिटणीस, एक कोषाध्यक्ष, एक
कार्यालयमंत्री, 60 कार्यकारिणी सदस्य यांसह विशेष निमंत्रित, निमंत्रित सदस्य अशी एकूण 150 जणांची कार्यकारिणी असल्याची माहिती प्रभाकर सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

येथील शरद कृषी भवन येथे राज्य उपाध्यक्ष अतुल काळसेकर, सावंतवाडी विधानसभा प्रमुख राजन तेली, जिल्हा कार्यकारिणी निमंत्रित सदस्य राजू राऊळ यांच्या उपस्थितीत ही कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष सावंत यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली. केंद्रीयमंत्री नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा प्रमुख निलेश राणे, आ नितेश राणे, राजन तेली, मनोज रावराणे यांच्या सहकार्याने कार्यकारिणी रचना पूर्ण करण्यात आलेली असून भाजपाच्या घटनेप्रमाणे संघटनमंत्री शैलेंद्र दळवी, जिल्हा प्रभारी महेश जाधव, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मान्यता यासाठी घेण्यात आलेली आहे, असे यावेळी सावंत यांनी सांगितले.
आगामी काळात लोकसभा, विधानसभेसह अनेक निवडणुकांचे आवाहन असल्याने संघटनेसाठी वेळ देणाऱ्या कार्यकर्त्यांना पदाधिकारी म्हणून संधी दिलेली आहे. यासाठी गेला महिनाभर संपूर्ण जिल्हाभर प्रवास करून जेष्ठ कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. जिल्ह्यातील तीन विधानसभा क्षेत्रातील आठही तालुक्यातील कार्यकर्त्यांना प्रमाणात संधी देत प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर महिलावर्ग आणि सामाजिक रचनेचा ताळमेळ सुद्धा साधण्यात आलेला आहे. या कार्यकारिणी नंतर विविध क्षेत्रातील 28 सेल संयोजकांच्या नियुक्त्या लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. भाजपाकडे मोठ्या संख्येने कार्यक्षम पदाधिकाऱ्यांची फौज आहे. त्या प्रत्येकाला संघटनेच्या कामात सक्रिय करून घेणार आहे.
ही सर्व मंडळी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेसाठी जास्तीचा वेळ देत संघटनेच्या घटना आणि ध्येयधोरणांप्रमाणे कार्यरत राहतील. भाजपाचा हा सुवर्णकाळ आहे. या काळात ‘कमळ’ निशाणीवर जिंकलेले खासदार आणि तीनही आमदार ही ‘बकेट लिस्ट’ नक्की पूर्ण करतील असा विश्वास प्रभाकर सावंत यांनी यावेळी व्यक्त केला.

गोट्या सावंत, संजू परब, अशोक सावंत उपाध्यक्ष
जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी जाहीर केलेल्या कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून प्रमोद रावराणे, अशोक सावंत, प्रसन्ना (बाळू) देसाई, संदेश (गोट्या) सावंत, सच्चिदानंद (संजू) परब, विजय केनवडेकर, सुषमा खानोलकर, सरोज परब, प्रियांका साळसकर यांना संधी देण्यात आली आहे. तर सरचिटणीस म्हणून महेश सारंग, रणजीत देसाई, संदीप साटम, शारदा कांबळे. कोषाध्यक्ष म्हणून चारुदत्त देसाई, जिल्हा कार्यालय मंत्री म्हणून समर्थ राणे, चिटणीस म्हणून एकनाथ नाडकर्णी, संतोष किंजवडेकर, विनायक राणे, महेश धुरी, संतोष कानडे, अनिल कांदळकर, दीपलक्ष्मी पडते, प्राची तावडे, मानसी धुरी, चंद्रकांत जाधव यांना संधी देण्यात आली आहे.
निमंत्रित सदस्य म्हणून विठठलराव नाईकधुरे, राजन म्हापसेकर, सदाशिव ओगले, राजन चिके, मंदार कल्याणकर, साईप्रसाद नाईक, राजश्री धुमाळे, मनोज नाईक, प्रकाश राणे, आरिफ बगदादी, राजेंद्र राणे, दिलीप गिरप, दीपक नारकर, बाबा मोंडकर, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, अशोक तोडणकर, संतोष साटविलकर, डॉ. सर्वेश नारकर, गोपाळ हरमलकर, विकास कुडाळकर, मोहन सावंत, गजानन गावडे, समीर नलावडे, गणेश हर्णे, संदीप गावडे, संतोष नानचे, अजय गोंदावळे यांची निवड करण्यात आली आहे. तर सदस्य म्हणून बाळा जठार, रविंद्र शेटये, बबन हळदिवे, दिलीप तळेकर, सुरेश सावंत, परशुराम झगडे, महेश लाड, शिशिर परुळेकर, भिवा वर्देकर, भाग्यलक्ष्मी साटम, मेघा गांगण, हर्षदा वाळके, प्राची कर्पे, संजय बांबुळकर, सदाशिव भुजबळ, लक्ष्मण पाळेकर, डॉ. अमोल तेली, मंगेश लोके, वैभव बिडये, सावी लोके, मनस्वी महेश घारे, भालचंद्र साठे, जयेंद्र रावराणे, संजय रावराणे, अरविंद रावराणे, लॉरेन्स मान्येकर, सचिन तेंडुलकर, किशोर मर्गज, पप्या तवटे, संदेश नाईक, अभय परब, नित्यानंद कांदळगावकर, उषा आठले, स्नेहा सावंत, साधना माडये, श्वेता लंगवे, आप्पा लुडबे, गणेश कुशे, महेंद्र चव्हाण, सुनील घाडीगावकर, राजू परुळेकर, राजन गावकर, ममता वराडकर, महानंदा खानोलकर, नीलिमा परुळेकर, संतोष कोदे, महेश बागवे, मधुकर चव्हाण, दिलीप सावंत, अनिल निव्हेकर, प्रमोद कामत, गुलाबराव गावडे, रविंद्र मडगावकर, परिमल नाईक, साबाजी धुरी, हेमंत मराठे, प्रियांका गावडे, रेश्मा सावंत, शर्वाणी गावकर, वंदना किनळेकर, घन:श्याम सामंत, स्मिता दामले, मनवेल फर्नाडीस, प्रीतेश राऊळ, संतोष गावडे, विनायक गवंडळकर, चेतन चव्हाण, श्रीकृष्ण गवस, लक्ष्मण नाईक, बळीराम नाईक, सुनीता भिसे, सिद्धेश पांगम, मृणाली मावळणकर यांची निवड करण्यात आली आहे.

विशेष निमंत्रित सदस्य
विशेष निमंत्रित सदस्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीयमंत्री नारायणराव राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, माधव भांडारी, अतुल काळसेकर, शैलेन्द्र दळवी, प्रमोद जठार, आ नितेश राणे, आ निरंजन डावखरे, आ ज्ञानेश्वर म्हात्रे, निलेश राणे, राजन तेली, मनोज रावराणे, अॅड.श्री.अजित गोगटे, शरद चव्हाण, संध्या तेरसे, दत्ता सामंत, प्रज्ञा ढवण, लखमराजे भोसले, अविनाश पराडकर, अनिल (बंड्या) सावंत, रश्मी लुडबे, मनीष दळवी, राजू राऊळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

श्वेता कोरगावकर, संदीप मेस्त्री यांना संधी
यासोबत भाजपाच्या संघटन कामात अत्यंत महत्वाच्या अश्या महिला, युवा, किसान, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, अल्पसंख्यांक या 7 मोर्चाचे अध्यक्ष सुद्धा जाहीर करण्यात आलेले आहेत. यामध्ये श्वेता कोरगावकर यांची जिल्हाध्यक्ष महिला मोर्चा, संदीप मेस्त्री यांची जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा, उमेश सावंत जिल्हाध्यक्ष किसान मोर्चा, नामदेव जाधव जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा, आनंद मेस्त्री जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चा, सुरेश पवार जिल्हाध्यक्ष आदिवासी मोर्चा, व्हिक्टर फर्नाडिस जिल्हाध्यक्ष अल्पसंख्यांक मोर्चा अशा निवडी करण्यात आल्या.

You cannot copy content of this page