राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ९५ प्रकरणे निकाली

⚡वेंगुर्ला ता.१०-: वेंगुर्ला दिवाणी न्यायालयात ९ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एकूण ९५ प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली असून २१ लाख १२ हजार १०३ एवढी रक्कम वसुल करण्यात आली.


तालुका विधी सेवा समिती वेंगुर्ला व तालुका बार संघटना वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन दिवाणी न्यायाधीश श्रीमती के.के.पाटील, सहदिवाणी न्यायाधीश डी.वाय.रायरीकर, पॅनेल सदस्य अॅड.पी.डी.नाईक यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते झाले. तडजोडीने मिटविण्यात आलेल्या प्रकरणांमध्ये दिवाणी ९, फौजदारी ३९, ग्रामपंचायत पाणीपट्टी, घरपट्टी, विविध बँका व विद्युत विभाग यांच्याकडील एकूण ४७ आदींचा समावेश आहे. यावेळी न्यायालयाच्या सहाय्यक अधिक्षक एस.एस.कांबळे, एस.एच.खेडेकर, वकीलवर्ग, पक्षकार व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page