बबन साळगावकर:भिंती तोडून महाराष्ट्र एकसंघ ठेवण्यासाठी बुद्धिजीवी टिकाकारांनी प्रयत्न करावा…
⚡सावंतवाडी ता.१०-: महाराष्ट्रात प्रत्येक समाजातील जातीजातीमध्ये आरक्षणावरून प्रचंड असंतोष आहे. पुरोगामी विचारसरणी आज महाराष्ट्राला परवडणारी नाही याचा प्रत्येक राजकीय पक्षाने विचार करुन आर्थिक निकषावरती आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करावेत असे मत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केले.
सद्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा विषय पुढे आला आहे.
याच पार्श्वभूमीवर श्री साळगावकर यांनी पत्रकार प्रसिद्धीस दिले असून त्यात त्यांनी असे म्हटले की, जातीय आरक्षणामुळे आज समाजात दुफळी पडत आहे. प्रत्येक जाती जातींमध्ये भिंती निर्माण होत आहे. या भिंती तोडून महाराष्ट्र एकसंघ ठेवण्यासाठी बुद्धिजीवी टिकाकारांनी प्रयत्न करावा. आरक्षणाचे महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलेले भूत हे महाराष्ट्राला परवडणारे नसलेले पुरोगामी विचारसरणी बाजूला सारून प्रत्येक राजकीय पक्षाने आता आर्थिक निकषावरती आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करावा.