विज्ञान नाटिका स्पर्धेत वेतोरे हायस्कूलची ‘सावधान‘ प्रथम

⚡वेंगुर्ला ता.१०-: वेंगुर्ला तालुकास्तरीय ‘विज्ञान-नाटिका‘ स्पर्धेत श्री देवी सातेरी हायस्कूल वेतोरेची ‘सावधान‘ प्रथम, उभादांडा न्यू इंग्लिश स्कूलची ‘अंधश्रद्धा‘ द्वितीय, तर पाटकर हायस्कूलची ‘मोबाईल द हिरो‘ या एकांकिकेने तृतीय क्रमांक पटकाविला. वेतोरे हायस्कूलच्या एकांकिकेची निवड जिल्हास्तरावर झाली आहे.
येथील रा.कृ.पाटकर हायस्कूलमध्ये घेतलेल्या या स्पर्धेत तालुक्यातून
आठ संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेचा शुभारंभ गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी यांच्या हस्ते झाला. यावेळी विस्तार अधिकारी सुनिता बाक्रे, मुख्याध्यापक
आत्माराम सोकटे, परिक्षक सुरेंद्र खामकर, प्रा.दत्ताजी राणे, प्रा.मनिषा मुजुमदार, बी.आर.सी.च्या मृणाल ठाकूर, विनोद सावंत, विज्ञान शिक्षिका सविता जाधव आदी उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सविता जाधव, मनिषा खरात, समिर पेडणेकर, स्वप्नाली पिळणकर, विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार उज्जयनी मांजरेकर यांनी मानले.

You cannot copy content of this page