घोटगेवाडी आरोग्य उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारी नेमा

शिक्षणमंत्री केसरकरांचे आरोग्यमंत्री सावंतांना पत्र;गोपाळ गवस यांनी वेधले होते लक्ष..

⚡दोडामार्ग,ता.१०-: घोटगेवाडी येथील आरोग्य उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यासाठी संबंधितांना आदेश द्या,असे लेखी पत्र शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना पाठवले आहे.मोर्लेतील शिवसेना पदाधिकारी (शिंदे गट) गोपाळ गवस यांनी मंत्री केसरकर यांचे डॉक्टर मागणीकडे निवेदनादवारे लक्ष वेधले होते.गेली तीन वर्षे घोटगेवाडी येथे वैद्यकीय अधिकारी नाहीत.त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचे हाल होत आहेत.

पावसाळ्यात मधल्या पुलावर पाणी आले की साटेली भेडशीतील आरोग्य केंद्रात वैद्यकीय तपासणीसाठी जायला दुरून फेरा मारून जावे लागते.त्यामुळे चोवीस तास सेवा देणारे वैद्यकीय अधिकारी नेमावे अशी मागणी श्री.गवस यांनी मंत्री केसरकर यांच्याकडे केली होती.त्यामुळे मंत्री केसरकर यांनी आरोग्यमंत्री सावंत यांना पत्र पाठवून घोटगेवाडीत वैद्यकीय अधिकारी नेमण्याबाबत कार्यवाही करण्यास कळविले आहे.

You cannot copy content of this page