⚡वेंगुर्ला ता.१०-: सामाजिक कार्यकर्त्या सुजाता पडवळ यच्या संकल्पनेतून तुळस आणि होडावडा गावातील महिलांचे सबलीकरण व सक्षमिकरण करण्याच्या उद्देशाने महिला बचत गटांसाठी मोफत मार्गदर्शन शिबिर आणि परिसंवाद चर्चासत्र तुळस सिद्धीविनायक मंगल कार्यालयात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन सिधुदुर्ग जिल्हा बँकेतील कर्ज विभागाचे अधिकारी मंदार चव्हाण यांच्या हस्ते झाले.
महिला विकास कक्ष प्रमुख नमिता खेडेकर यांनी वैयक्तिक कर्ज, योजना व बचत गट, उत्पादक गट, डिजिटल बँकिग, कर्ज धोरण, ठेवींच्या योजनांवर, सिधुदुर्ग उद्योजक सहयोग कक्ष प्रमुख सिद्धेश पवार यांनी विविध शासकीय योजनांची माहिती दिली. मंदार चव्हाण यांनी पशुधन आणि शेतीपुरक उपक्रम यावर, पंचायत समिती वेंगुर्ल्याचे तालुका अभियान व्यवस्थापक अमोल कावले आणि ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र कुडाळचे प्रशिक्षक चेतन पाटकर यांनीही विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी होडावडा सरपंच रसिका केळुसकर, उमेद अभियानाचे तुळस प्रभाग समन्वयक सायली आंगचेकर, उमेद अभियानाचे तुळस प्रभाग सीएलएफ व्यवस्थापक तनुजा परब यांच्यासह तुळस आणि होडावडा गावातील महिला उपस्थित होत्या. सूत्रसंचालन गायत्री धोंड यांनी तर आभार अश्विनी मांजरेकर यांनी मानले.
फोटोओळी – मार्गदर्शन शिबिर आणि परिसंवाद चर्चासत्रात अधिका-यांनी महिलांना मार्गदर्शन केले.