बाबूराव धुरी यांची विद्युत वितरणकडे मागणी
⚡दोडामार्ग,ता.१०-: गणेशोत्सवापर्यंत वीज वितरण कंपनीने कोणत्याही कारणासाठी वीजपुरवठा खंडित करू नये,अशी मागणी बाबूराव धुरी यांनी केली आहे.
तालुक्यामध्ये सुरू असलेल्या नवीन वीजवाहिन्या घालण्यासाठी वारंवार वीजपुरवठा खंडित केला जातो.
त्यामुळे गणेश मूर्तिकार,व्यापारी आणि सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हाप्रमुख बाबूराव धुरी यांनी सहायक अभियंता श्री. नलावडे यांचे लक्ष वेधले.गणेशचतुर्थी पूर्वी केवळ एक दिवस 4 तासांसाठी वीजपुरवठा खंडित केला जाईल त्यानंतर वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यात येईल असे आश्वासन श्री.नलावडे यांनी दिले.