बांबुळी येथे नर्स म्हणून कामाला असलेली सावंतवाडीतील युवती बेपत्ता…

ओल्ड गोवा पोलिसात वडिलांची तक्रार ; पोलिसांकडून तपास सुरु..

⚡पणजी ता.०८-: बांबोळी येथील एका परिचारिका म्हणून कार्यरत असलेली सावंतवाडी तालुक्यातील एक नर्स दोन दिवसांपासून बेपत्ता झाली आहे. यज्ञा दळवी असे त्यांचे नाव आहे. 6 सप्टेंबरपासून त्या बेपत्ता आहेत. याबाबत ओल्ड गोवा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दोन पथके तयार करून या तरूणीचा शोध घ्यायला सुरवात केली आहे. 6 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजल्यापासून तिच्याशी कसलाही संपर्क होऊ शकलेला नाही, असे तिच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे. पोलिस निरीक्षक सतीश पडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे

You cannot copy content of this page