प्रमोद जठार भावी खासदार…

जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी केला उल्लेख:भैया सामंत आयोजित शिवसेनेचा दहीहंडी उत्सव संपन्न.

⚡कणकवली ता.०७-: प्रमोद जठार हे आमचे भावी खासदार असून त्यांना मी आता शुभेच्छा देतो असे प्रतिपादन आज येथे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी दहीहंडी उत्सव कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावर बोलताना केले. दरम्यान यावेळी खारेपाटण येथे त्यांनी मला बोलवून माझा मानसन्मान केला याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे, असे देखील त्यांनी गौरद्धार काढले.

आज शिंदे शिवसेनेच्या वतीने किरण उर्फ भैया सामंत पुरस्कृत शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे व युवा सेना जिल्हाप्रमुख सुकांत वरूणकर यांच्या मार्गदर्शनाखाली दहीहंडी उत्सव आयोजन करण्यात आले होते. यावेळी राजापूर येथील महिला गोविंदा पथकाकडून दहीहंडी फोडण्यात आली.

दरम्यान दहीहंडी येणाऱ्या पथकाचा येथील शिंदे शिवसेनेच्या वतीने शाल, श्रीफळ व रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम या दहीकाला उत्सवाचे खास आकर्षण ठरले. यावेळी खारेपाटण पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

दरम्यान यावेळी राम कृष्णाची रथ मधून भव्य मिरवणूक देखील खारेपाटण शहरात काढण्यात आली.

सरपंच प्राची इसवलकर, विधानसभा संपर्क प्रमुख संदेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य गुरूप्रसाद शिंदे, तंटामुक्त समिती अध्यक्ष सुसास राऊळ, भास्कर राणें, नंदीनी पराडकर आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page