‘बरसती रंगसरी’ कार्यक्रम ठरला सांस्कृतिक मेजवानी ; रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*⚡मालवण ता.०५-:* अ. भा. मराठी नाटय परिषद शाखा मालवण व नगर वाचन मंदिर मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने मामा वरेरकर नाटयगृह येथे बरसती रंगसरी हा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. नृत्य, नाटय अभिवाचन, प्रहसन आणि संगीत या कलाविष्कारांचा अपूर्व मिलाफ असलेला हा कार्यक्रम रसिकांसाठी सांस्कृतिक मेजवानी ठरलं. या कार्यक्रमाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन आणि नटराजपूजन करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक अरविंद म्हापणकर, नाटयपरिषद मालवण शाखा अध्यक्ष प्रकाश कुशे, कार्यवाह संजय शिंदे, ज्येष्ठ सदस्य सदा चुरी, सुशांत पवार, अक्षय सातार्डेकर, पलाश चव्हाण, सुधीर गोसावी आदी उपस्थित होते.नाटयपरिषद मालवण शाखेच्या परंपरेप्रमाणे ‘नमन नटवरा विस्मयकारा’ या नांदीने कार्यक्रमाची सुरूवात झाली. कु. रिया म्हाडगुत हिने गुरूवंदना हे कथ्थक नृत्य सादर करून कार्यक्रमाची सुरूवात अप्रतिमरित्या केली. श्लोक सामंत याने सवेश नाट्यपद आणि एकपात्री दशावतार सादर केले. यानंतर ऑकेस्ट्रा बरसती रंगसरी कोळीगीत पॅच आणि हिंदी गाणी मोठया दणक्यात सादर झाली. यामध्ये उज्वला करलकर, गौरवी पराडकर, सुशांत पवार व संजय शिंदे या गायकांनी कोळीगीत आणि जुनी हिंदी गाणी सादर केली. याची संगीतसाथ सिंथेसायझर प्रफुल्ल गोसावी, ऑक्टोपेंड हर्षद खराडे, तबला/ ढोलकी सुधीर गोसावी यांनी केली. कलाविष्कार डान्स अकॅडमीच्या कलावंतांनी माऊली डान्स, आईचा सोहळा, परम सुंदरी, साऊथ इंडियन डान्स हे एका पेक्षा एक सरस डान्स सादर केले. या नृत्यांमध्ये नंदिनी परब, तेजस्वी पाटकर, स्वराली मोरे, पार्श्व शिरहट्टी, विभुती ढोके, जय परब, अनुष्का चव्हाण, केतकी सावजी, सारिका माणगावकर, राणी पराडकर, यशश्री वरक, गीता आचरेकर, आद्या तिडके, मनस्वी देवकाते, निरजा ढोलम आणि श्रिया माणगावकर या कलाकारांनी सहभाग घेतला होता. या सर्व नृत्यांचे नृत्य दिग्दर्शन सिध्देश पालव यांनी करतानाच ‘कृष्ण थीम’ हे अफलातुन नृत्य सादर करून रसिकांची दाद मिळविली.तर कलांकुर ग्रुप मालवण यांनी कोळी समुहनृत्य सादर करून कार्यक्रमात बहार आणली. यामध्ये शुभदा टिकम, संकेत हसोळकर, ओम आटक, ओम मालवणकर, तेजस कातवणकर, रिना मराळ, रिधी सरमळकर आणि पायल जोशी या कलाकारांनी सहभाग घेतला होता. या नृत्याचे दिग्दर्शन संकेत हसोळकर यांनी केले. यानंतर प्र.ल. मयेकर लिखीत सुप्रसिध्द नाटक रातराणी या नाटकातील एका प्रवेशाचे नाटय अभिवाचन केले. यामध्ये सुजाता शेलटकर, अक्षय सातार्डेकर, संजय शिंदे आणि ऋतुजा केळकर यांनी सहभाग घेतला होता. याचे पार्श्वसंगीत शुभदा टिकम व प्रकाशयोजना लक्ष्मण नेरकर यांनी केले. श्लोक सामंतप्रमाणेच पार्थ सामंत या बाल कलाकाराने एकपात्री दशावतार आपल्या वेगळ्या शैलीत सादर केले. धम्माल विनोदी प्रहसन MHJ अर्थात मालवणची हास्यजत्रा कलांकुर ग्रुप मालवणच्या कलाकारांनी सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. पलाश चव्हाण व श्रेया चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला.बरसती रंगसरी ५ या कार्यक्रमाच्या दरम्यान नाटय परिषद मालवण शाखेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत मालवण नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा कृतज्ञता सत्कार शाल, त्रिफळ व गुलाबपुष्प देऊन करण्यात आला. यामध्ये एकुण ३२ स्वच्छता कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.

⚡मालवण ता.०५-: अ. भा. मराठी नाटय परिषद शाखा मालवण व नगर वाचन मंदिर मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने मामा वरेरकर नाटयगृह येथे बरसती रंगसरी हा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. नृत्य, नाटय अभिवाचन, प्रहसन आणि संगीत या कलाविष्कारांचा अपूर्व मिलाफ असलेला हा कार्यक्रम रसिकांसाठी सांस्कृतिक मेजवानी ठरलं.

या कार्यक्रमाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन आणि नटराजपूजन करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक अरविंद म्हापणकर, नाटयपरिषद मालवण शाखा अध्यक्ष प्रकाश कुशे, कार्यवाह संजय शिंदे, ज्येष्ठ सदस्य सदा चुरी, सुशांत पवार, अक्षय सातार्डेकर, पलाश चव्हाण, सुधीर गोसावी आदी उपस्थित होते.

नाटयपरिषद मालवण शाखेच्या परंपरेप्रमाणे ‘नमन नटवरा विस्मयकारा’ या नांदीने कार्यक्रमाची सुरूवात झाली. कु. रिया म्हाडगुत हिने गुरूवंदना हे कथ्थक नृत्य सादर करून कार्यक्रमाची सुरूवात अप्रतिमरित्या केली. श्लोक सामंत याने सवेश नाट्यपद आणि एकपात्री दशावतार सादर केले. यानंतर ऑकेस्ट्रा बरसती रंगसरी कोळीगीत पॅच आणि हिंदी गाणी मोठया दणक्यात सादर झाली. यामध्ये उज्वला करलकर, गौरवी पराडकर, सुशांत पवार व संजय शिंदे या गायकांनी कोळीगीत आणि जुनी हिंदी गाणी सादर केली. याची संगीतसाथ सिंथेसायझर प्रफुल्ल गोसावी, ऑक्टोपेंड हर्षद खराडे, तबला/ ढोलकी सुधीर गोसावी यांनी केली. कलाविष्कार डान्स अकॅडमीच्या कलावंतांनी माऊली डान्स, आईचा सोहळा, परम सुंदरी, साऊथ इंडियन डान्स हे एका पेक्षा एक सरस डान्स सादर केले. या नृत्यांमध्ये नंदिनी परब, तेजस्वी पाटकर, स्वराली मोरे, पार्श्व शिरहट्टी, विभुती ढोके, जय परब, अनुष्का चव्हाण, केतकी सावजी, सारिका माणगावकर, राणी पराडकर, यशश्री वरक, गीता आचरेकर, आद्या तिडके, मनस्वी देवकाते, निरजा ढोलम आणि श्रिया माणगावकर या कलाकारांनी सहभाग घेतला होता. या सर्व नृत्यांचे नृत्य दिग्दर्शन सिध्देश पालव यांनी करतानाच ‘कृष्ण थीम’ हे अफलातुन नृत्य सादर करून रसिकांची दाद मिळविली.

तर कलांकुर ग्रुप मालवण यांनी कोळी समुहनृत्य सादर करून कार्यक्रमात बहार आणली. यामध्ये शुभदा टिकम, संकेत हसोळकर, ओम आटक, ओम मालवणकर, तेजस कातवणकर, रिना मराळ, रिधी सरमळकर आणि पायल जोशी या कलाकारांनी सहभाग घेतला होता. या नृत्याचे दिग्दर्शन संकेत हसोळकर यांनी केले. यानंतर प्र.ल. मयेकर लिखीत सुप्रसिध्द नाटक रातराणी या नाटकातील एका प्रवेशाचे नाटय अभिवाचन केले. यामध्ये सुजाता शेलटकर, अक्षय सातार्डेकर, संजय शिंदे आणि ऋतुजा केळकर यांनी सहभाग घेतला होता. याचे पार्श्वसंगीत शुभदा टिकम व प्रकाशयोजना लक्ष्मण नेरकर यांनी केले. श्लोक सामंतप्रमाणेच पार्थ सामंत या बाल कलाकाराने एकपात्री दशावतार आपल्या वेगळ्या शैलीत सादर केले. धम्माल विनोदी प्रहसन MHJ अर्थात मालवणची हास्यजत्रा कलांकुर ग्रुप मालवणच्या कलाकारांनी सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. पलाश चव्हाण व श्रेया चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला.

बरसती रंगसरी ५ या कार्यक्रमाच्या दरम्यान नाटय परिषद मालवण शाखेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत मालवण नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा कृतज्ञता सत्कार शाल, त्रिफळ व गुलाबपुष्प देऊन करण्यात आला. यामध्ये एकुण ३२ स्वच्छता कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.

You cannot copy content of this page