तेरेखोल नदीपात्रात वृद्धाचा बुडून मृत्यू…

*💫बांदा दि.०६-:* इन्सुली कुडवटेंब येथील अमृत सखाराम सावंत (८०) हे वृध्द पाय घसरून तेरेखोल नदीपात्रात बुडाल्याची घटना आज रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. तुळसाण पुलाखाली असलेल्या बंधाऱ्याच्या खालच्या दिशेने ते कोसळले. याबाबतची माहिती मिळताच भाजपचे कार्यकर्ते विकी केरकर यांनी त्यांना पाण्यातून बाहेर काढले. त्यांना रुग्णवाहिकेने बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी त्यांना मृत घोषित केले. बांदा पोलिसांत याबाबत फिर्याद देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

You cannot copy content of this page