जिल्हाधिकाऱ्यांबाबत तानाजी कांबळे यांनी केलेल्या तक्रारी हास्यास्पद…

यापुढे त्यांच्या विरोधात तक्रारी केल्यास जिल्ह्यातील सर्व सामाजिक संघटना त्यांच्या पाठीशी उभ्या करू;मंगेश तळवणेकर यांचा इशारा_*

*💫सावंतवाडी दि.०६-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कार्यक्षम जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्याबाबत तानाजी कांबळे यांनी केलेल्या तक्रारी या हास्यास्पद आहेत. अशा अव्वल दर्जाच्या अधिकाऱ्यांचे कौतुक करण्याऐवजी त्यांच्या विरोधात तक्रारी केल्यास जिल्ह्यातील सर्व सामाजिक संघटना त्यांच्या पाठीशी उभ्या करू, असा इशारा असे माजी शिक्षण सभापती तथा विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिला आहे. प्रसिद्धीपत्रका तळवणेकर म्हणाले, के. मंजुलक्ष्मी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला, तिथपासून ते आजपर्यंत त्यांनी केलेले काम हे शब्दांत न सांगता येण्यासारखे आहे. अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना नाहक त्रास देणे, हे चुकीचे आहे. जिल्हाधिकारी यांनी कोरोना काळात आरोग्य यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा आदी सर्व योग्य पध्दतीने हाताळत जिल्ह्यातील जनतेला कोरोनाच्या विळख्यातून बाहेर काढले. कोरोना पार्श्वभूमीवर नियमित पत्रकार परिषद घेऊन तसेच जिल्हा रुग्णालये, कोविड सेंटर, डॉक्टर, कर्मचारी, रुग्ण आदींना प्रत्यक्ष भेटी देत वारंवार धीर दिला, अशा अव्वल दर्जाच्या अधिकाऱ्यांचे कौतुक करण्याऐवजी त्यांच्या विरोधात तक्रारी केल्यास जिल्ह्यातील सर्व सामाजिक संघटना त्यांच्या पाठीशी उभ्या करू. तसेच जिल्ह्यातील जनता नेहमीच जिल्हाधिकाऱ्यांच्यासोबत असेल, असे तळवणेकर यांनी म्हटले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी अशा भाबड्या तक्रारींवर लक्ष न देता आपले काम करत रहावे, असेही तळवणेकर म्हणाले

You cannot copy content of this page