“आराध्य सिनेमा”मुळे जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल…

रेणूताई गावस्कर; सिनेमा थिएटरमुळे जिल्हातील उणीव भरून निघाल्याचेही गौरवोद्गार …

सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मल्टिप्लेक्स थिएटरची उणीव बांधकाम व्यावसायिक उदय पारळे व त्यांच्या पत्नी सौ.स्मिता पारळे यांनी “आराध्य सिनेमा”च्या निर्मितीतून भरुन काढली
भविष्यात या सिनेमा थिएटरमुळे जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल असे गौरवोद्गार मुळ मुंबईच्या व सद्या कुडाळ बांबर्डे येथे स्थाईक झालेल्या सामाजिक कार्यकर्त्या रेणूताई गावस्कर यांनी काढल्या.

मुंबई गोवा महामार्गावर झाराप झिरो पॉईंट नजिक नेमळे पुलाजवळ श्री व सौ पारळे यांनी सुरू केलेल्या आराध्य सिनेमा थिएटरचे उद्घाटन श्रीमती गावस्कर यांच्या हस्ते पार पडले यावेळी त्या आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावरून बोलत होत्या एका कार्यक्रमासाठी त्यांच्यासोबत प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडीचे उद्योजक शैलेश पै, कर सल्लागार अशोक सारंग,आर्किटेक साहस पाटील, अकेरी सरपंच महेश जामदार अॅड नकुल पार्सेकर बांधकाम व्यवसायिक शरद सावंत,राजेंद्र पाटील,डॉ.हर्षदा देवधर,जयेंद्र तेली श्रीराम धुरी यांच्यासह उदय पारळे व त्यांच्या पत्नी स्मिता पारळे या उपस्थित होत्या.

श्रीमती गावस्कर म्हणाल्या,साधारण दीड वर्षांपूर्वी आपण कोकणात आले आपल्याला सिनेमा पाहण्याची असलेली प्रचंड आवड लक्षात घेता या ठिकाणी सिनेमा थिएटर उपलब्ध नसल्याचे ऐकून एक प्रकारची खंत मनात निर्माण झाली होती परंतु हे खंत आज आराध्य सिनेमाच्या माध्यमातून दूर होते त्याचा आपल्याला आनंद होत आहे मुळात सिनेमा हे अत्यंत महत्त्वाचे प्रभावशाली शैक्षणिक माध्यम आहे दोन-तीन तास एकाच ठिकाणी एकाग्रतेने एखाद्या कथा मालेत आपण तल्लीन झाल्यानंतर तो सिनेमा आपल्याला विचार करण्यासाठी खूप मोठे खाद्य देत असतो त्यामुळे आपल्या मुलांच्या भावविश्वाला चालना द्यायची असेल तर प्रत्येकाने मुलांसोबत एकदा तरी सिनेमा पहिल्याच पाहिजे.

एकुणच पर्यटनदृष्ट्या प्रगतीपथावर आलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिनेमा थिएटरची उभारणी करुन श्री व सौ पारळे यांनी यामध्ये आणखीनच भर टाकली आहे.
यावेळी उद्योजक श्री पै म्हणाले, ज्याच्या नावातच उदय आहे अशा श्री पारळे यांनी आत्तापर्यंतच्या सर्व स्वतःच्या वाटचालीत अनेकांच्या जीवनात उदय आणला,अनेकांच्या हाताला काम देण्याचा त्याचा नेहमीच प्रयत्न राहीला. आयुष्यात काहीतरी करायचे आहे या जिद्दीने त्याने स्वतःच मोठे केले आहे. मात्र आकाशाला गवसणी घालूनही त्यांचे पाय नेहमीच जमिनीवर राहीले आहेत. कामगार वर्ग हा सुद्धा आपल्या कुंटूबातीलच घटक आहे असे मानुन ते काम करत आलेत आणि म्हणूनच ते इथपर्यंत झेप घेऊ शकते.
यावेळी प्रास्ताविकात श्री पारळे म्हणाले, सिंधुदुर्गातील कमतरता लक्षात घेऊन अशा प्रकारचे सिनेमा थिएटर रेस्टॉरंट हॉल लाॅन आधी सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध असणारी वास्तू उभारण्याची इच्छा आपल्या मनात होती आणि हीच इच्छा घेऊन आपण वाटचाल सुरू केली आणि इथपर्यंत पोहचलो. या आपल्या प्रवासामध्ये आई वडिलांसोबत पत्नीची खूप मोठी साथ लाभली. बांधकाम क्षेत्रातील मित्रपरिवार आर्किटेक यांचेही योगदान यामध्ये महत्त्वाचे आहे मुळात सिनेमा थिएटर ही संकल्पना मित्र विजय सावंत यांच्या संकल्पनेतून आलेली आहे. यामध्ये अनेकांचे एकत्रित हात आहेत भविष्यातही अशा नवनवीन संकल्पनेतून जिल्ह्याच्या पर्यटनासाठी आपण प्रामाणिकपणे काम करणार आहे.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते ज्यांनी ज्यांनी त्यांना या प्रकल्पाच्या वाटचालीस मदत केली ज्यांचे योगदान लागले त्या सर्वांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला. शेवटी आभार प्रदर्शन सौ.स्मिता पारळे यांनी मानले.

You cannot copy content of this page