कुडाळ नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदी किरण शिंदे यांची बिनविरोध निवड

कुडाळ, प्रतिनिधी

कुडाळ नगरपंचायतीच्या उप नगराध्यक्ष पदी उद्धव बाळासाहेब शिवसेना गटाचे किरण शिंदे यांची वर्णी लागली आहे.
कुडाळ नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट यांनी दीड वर्षे पूर्ण करून आपल्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा काही दिवसांपूर्वी दिला होता. त्यामुळे हे उपनगराध्यक्ष पद रिक्त झाले होते. या उपनगराध्यक्ष पदावर आज (शुक्रवारी) उध्दव ठाकरे गटाचे किरण शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
आज कुडाळ नगरपंचायतीमध्ये निवडणूक अधिकारी तथा कुडाळच्या प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांनी
उपनगराध्यक्षपदी” किरण शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. ही निवड बिनविरोध झाली आहे. यावेळी नगराध्यक्ष अक्षता खटावकर, मुख्याधिकारी अरविंद नातू तसेच नगरपंचायतीचे नगरसेवक व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. नगराध्यक्षा अक्षता खटावकर, नगरसेविका श्रेया गवंडे, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक मंदार शिरसाट, नगरसेवक उदय मांजरेकर यांच्या अन्य नगरसेवकांनी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष किरण शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

You cannot copy content of this page