साळकुंभा येथे बोअरवेल नळपाणी योजना कामाचा शुभारंभ

⚡मालवण ता.०१-:
नांदरुख साळकुंभा येथे बोअरवेल मधून पाणीपुरवठा करण्यासाठी टाकी व नळपाणी योजनेच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या बोअरवेल मधून घरांना नळ जोडणी देऊन पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

यावेळी नांदरुख ग्रामपंचायतीचे सरपंच रामचंद्र उर्फ भाऊ चव्हाण, उपसरपंच दशरथ पोखरणकर, बाबू मांजरेकर, भूषण गावडे, राजन गावडे, श्री. वस्त, संतोष चव्हाण, महेश चव्हाण, सिद्धेश साळकर, रुपेश गावडे, विलास गावडे, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या.

You cannot copy content of this page