स्पोर्ट्स फाउंडेशन सिंधुदुर्ग नॅशनल स्पोर्टस डे रन विजेत्यांचा गौरव..
⚡कणकवली ता.२९-:
स्पोर्ट्स फाउंडेशन सिंधुदुर्गची मॅरेथॉन स्पर्धा मुलांना व्यासपीठ मिळवून देणारा हा कार्यक्रम आहे.मुलांसाठी जीवनात स्पर्धा आवश्यक आहे.शिक्षणात सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अव्वल स्थानावर आहे.स्पर्धामध्ये देखील आपल्या विद्यार्थ्यांनी सराव केला पाहिजे.ज्यांनी बक्षीस मिळविली आहेत,त्यांनी यशाचे सातत्य राखावे,असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक मंडळ सचिव बाळासाहेब वळंजू यांनी केले.
स्पोर्ट्स फाउंडेशन सिंधुदुर्ग नॅशनल स्पोर्टस डे रन २०२३ निमित्त दुसरी जिल्हास्तरीय आंतर शालेय , महाविद्यालय स्तर मॅरेथॉन स्पर्धा कणकवली कॉलेज मैदानावर पार पडली.व्यापारी संघ अध्यक्ष दीपक बेलवलकर,राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक,क्रीडा समन्वयक कणकवली,स्पर्धा संयोजक बयाजी बुराण,विद्यामंदिर मुख्याध्यापक पी.जे.कांबळे,बँक संचालक समीर सावंत,प्राचार्य श्री.महालिंगे सर,शहराध्यक्ष अण्णा कोदे,पत्रकार भगवान लोके,संजय सावंत, सिंधुदुर्ग स्पोर्ट्सचे सेक्रेटरी डी डी सावंत, खजिनदार प्रशांत घाडीगावकर, सहखजिनदार तेजस घाडीगावकर , स्वप्निल कदम, रोशन सावंत, रिद्धी घाडीगावकर, ओमकार कदम,संकेत घाडीगावकर, भूषण घाडीगावकर,
बाळू किर्लोस्कर, कृष्णा घाडीगावकर, दिलीप घाडीगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
विविध गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली.या मॅरेथॉन स्पर्धेत २७५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या सहभागी विद्यार्थ्यांना मेडल्स,प्रमाणपत्र देण्यात आले.
स्पोर्ट्स फाउंडेशन सिंधुदुर्ग वतीने आयोजित नॅशनल स्पोर्टस डे रन २०२३ निमित्त मॅरेथॉन स्पर्धा विजेत्यांमध्ये -१२ वर्षाखालील मुले -अनुक्रमे विक्रम भटकुळे,पृथ्वीराज राठोड,अर्णव चुडे व १२ वर्षाखालील मुली अनुक्रमे श्रावणी माडेश्वर,अनया कुंभार,अंकिता चव्हाण आदी विद्यार्थी विजेते ठरले.
१४ वर्षाखालील मुले – अनुक्रमे साहिल चाळके,आशीर्वाद सातपुते,राकेश शेठ तसेच १४ वर्षाखालील मुली अनुक्रमे -आकांक्षा कुंभार,दीपिका अथवा, आर्या ठाकूर आदी विद्यार्थी विजेते ठरले.
१७ वर्षाखालील मुले अनुक्रमे – अनुक्रमे विराज मुंगेकर,यश सावंत,अथर्व कासारकर तसेच
१७ वर्षाखालील मुली अनुक्रमे -वैष्णवी सावंत,मेघा सातपुते,प्रेक्षा सावंत आदी आदी विद्यार्थी विजेते ठरले.
२० वर्षाखालील मुले अनुक्रमे -देवराज घाडी,प्रथमेश पुजारे,
दीप माणगावकर,२० वर्षाखालील मुली अनुक्रमे -आर्या तांबे,निकिता लाड,नम्रता गावडे तसेच खुला गटात अनुक्रमे पुरुष -आशुतोष रवींद्र गुरुके,अशितोष चौगुले तर महिला गटात चंद्रकला सातपुते,सुरेखा मेस्त्री ,अमृता वेजरे आदींना प्रमाणपत्र, मेडल्स, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
