⚡मालवण ता.२७-: देवबाग येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महिला आघाडी, युवती सेना आणि मालवण तालुकाप्रमुख श्री. हरी खोबरेकर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या नारळ लढविणे स्पर्धेत महिलांमध्ये श्रद्धा लोणे यांनी विजेतेपद पटकाविले तर लहान गटात वैभव लोंढे याने विजेतेपद पटकावित बाजी मारली
देवबाग येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महिला आघाडी, युवती सेना आणि मालवण तालुकाप्रमुख श्री. हरी खोबरेकर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या नारळ लढविणे स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना माजी जिल्हा प्रमुख भाई गोवेकर यांच्या हस्ते झाले या स्पर्धेला महिला व छोट्या मुला- मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला
या स्पर्धेत महिलांमध्ये श्रद्धा लोणे प्रथम क्रमांक, रमिता येरागी द्वितीय क्रमांक, वैशाली मोंडकर तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. छोट्या मुला-मुलींनमध्ये वैभव लोंढे प्रथम क्रमांक, किंजल वालावलकर द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले. युवतीसेना जिल्हा विस्तारक रुची राऊत पुरस्कृत साडी लकी ड्रॉ मध्ये कल्पना चोडणेकर व अन्य महिला विजयी ठरल्या
यावेळी श्री. भाई गोवेकर यांनी किनारपट्टीतील लोकांचा, मच्छिमारांचे नेतृत्व हरी खोबरेकर हे झंझावाती तालुकाप्रमुख अश्या शब्दांत त्यांचे विशेष कौतुक केले. पूर्वी पुरुषांच्या स्पर्धा होत असत आता मात्र चित्र बदलले आहे. आता महिला युग आले असून महिलांच्या स्पर्धा होत असताना दिसतात. हा कार्यक्रमाचे सर्व श्रेय देवबाग मधील भगिनींचे त्यांनी पुढाकार घेऊन स्पर्धा यशस्वी करण्याऱ्या सर्व महिला आघाडी, युवतीसेना, शिवसेना , युवासेना सर्वांचे अभिनंदन केले व नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी जेष्ठ दशावतार कलाकार श्री. जीजी चोडणेकर,हरी खोबरेकर, सेजल परब ,शिल्पा खोत , पूनम चव्हाण यांची समयोचित भाषणे झाली
यावेळी संगिता वेंगुर्लेकर, सुप्रिया केळुसकर,देवबाग संपर्क प्रमुख तथा मालवण उपशहर प्रमुख सन्मेश परब,युवती सेना मालवण तालुका अधिकारी निनाक्षी मेतर, युवतीसेना मालवण उपतालुका अधिकारी हिना कांदळगांवकर, युवासेना मालवण विभाग अधिकारी चंदू खोबरेकर, युवतीसेना मालवण शहर अधिकारी सुर्वी लोणे, युवतीसेना मसुरा विभाग अधिकारी आर्या गांवकर, युवतीसेना मालवण उपशहर अधिकारी माधुरी प्रभू, तारकर्ली शाखाप्रमुख आबा केळुसकर, उपविभाग समन्वयक राजू मेस्त्री, मनोज खोबरेकर, उपविभाग प्रमुख अनिल केळुसकर,शाखा प्रमुख रमेश कद्रेकर, शाखाप्रमुख अक्षय वालावलकर, शाखा प्रमुख मोहन कांदळगांवकर, वैभव खोबरेकर, शांती तोंडवळकर,उपशाखा प्रमुख गणपत राऊळ, गजानन मांजरेकर, दांडी शाखाप्रमुख हेमंत मोंडकर, दपर्णा केळुसकर-राऊळ, करण खडपे, स्वरा रोगे, अंकिता मालंडकर, शिल्पा खवणेकर, प्रिया धुरी, दया टिकम, अनुष्का राऊळ, प्राची तोरसकर, सीमा पाटील, युवासेना उपशहर अधिकारी अक्षय रेवंडकर आदी उपस्थित होते.
