राजन तेली:आडेली ग्रामपंचायतीला भेट देऊन विकासकामांचा घेतला आढावा…
वेंगुर्ला प्रतिनिधी-माजी आमदार व भाजपा माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आडेली ग्रामपंचायतीला भेट देऊन विकासकामांचा आढावा घेतला. सरपंच यशस्वी कोंडसकर व ग्रामविकास अधिकारी अनिल चव्हाण यांनी विविध कामांबाबत तांत्रिक समस्यांची माहिती दिली. अपूर्ण कामे जिल्हा नियोजन, बजेट, पुरवणी आराखड्यात कामे समाविष्ट करुन देणार असल्याचे आश्वासन राजन तेली यांनी दिले.
यात प्रामुख्याने भंडारवाडी गोपीनाथ तलाव, जनजीवन मिशन यावर चर्चा झाली. भाजप तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, तालुका चिटणीस समीर कुडाळकर, वेंगुर्ला तालुका सरपंच संघटना अध्यक्ष पप्पू परब, उपसरपंच परेश हळणकर, शक्ती केंद्र प्रमुख तात्या कोंडसकर, भाजपा पदाधिकारी राजू सामंत, ग्रामपंचायत सदस्य वैभव कोंडसकर, भुमिका सावंत, ज्येष्ठ पदाधिकारी दादा धर्णे, सुधीर मुंडये, पप्पू धर्णे, प्रशांत धर्णे, रामा कोंडसकर, बाळा म्हारव, मंगेश आडेलकर, वैशाली कुडाळकर, सोनसुरकर, भाजप कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
