⚡मालवण ता.२७-: मालवणची ग्रामदेवता श्री देव रामेश्वर, नारायण, सातेरी देवस्थान यांच्यावतीने श्रावणातील वार्षिक उत्सवाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
यानिमित्त २ सप्टेंबर रोजी पहिला दादरा, ३ रोजी दुसरा व तिसरा दादरा, ४ रोजी तिसरा श्रावणी सोमवार – श्री देवी सातेरी मंदिरात वार्षिक जत्रा. ६ ते ११ सप्टेंबर कालावधीत श्री. देव नारायण मंदिरात श्री कृष्ण जन्माष्टमी उत्सवानिमित्त कीर्तन कार्यक्रम. चौथा श्रावणी सोमवार ११ रोजी श्री देवी भावईची जत्रा व श्री रामेश्वर मंदिरामध्ये श्री वरद शंकराची महापूजा, २७ रोजी नव्याचा मुहूर्त सकाळी ८ वा. आदी कार्यक्रम होणार आहेत. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
