गुरुनाथ आईर: आमदार भाई जगताप यांच्याकडे केली मागणी…
⚡सावंतवाडी ता.२४-: सांगेली-घोलेवाडी या पाच किलोमिटरचा रस्त्याच्या कामासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी सावंतवाडी काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष गुरुनाथ आईर यांनी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान आमदार भाई जगताप यांच्याकडे केली आहे.
हा मार्ग अतिदुर्गम आणि डोंगराळ भागात असल्यामुळे परिसरातील वाड्यांना विशेषतः लहान मुले व जेष्ठ नागरिकांना दळणवळणासाठी मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे याबाबत तात्काळ योग्य ती भूमिका घ्यावी, अशी मागणी आईर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मुंबई येथे भेट घेवून श्री जगताप यांना निवेदन दिले आहे.
