*तो टॉवर पालिकेकडून काढून टाकणार ;प्रसंगी राजीनामा देण्याचा नगरसेवक नासिर शेख यांचा इशारा*
*💫सावंतवाडी दि.०५-:* शहरात बाहेरचा वाडा कुणकेरी रोड परिसरातील जागेत इंडस टॉवर लिमिटेड कंपनीचा मोबाईल टॉवर उभारण्यास परवानगी दिली जाऊ नये. अशी मागणी तेथील नागरिकांनी केली होती. मात्र, तरी देखील संबंधित कंपनीकडून त्या ठिकाणी टॉवर उभारण्यात आल्याने स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत. हा परिसर दाट लोकवस्तीचा असून, या ठिकाणी असलेल्या मोबाईल टॉवरमुळे लोकांच्या, लहान मुलांच्या जीवितास धोका निर्माण होणार असल्याची भिती येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, आपण नागरिकांच्या सोबत असून योग्य ती कारवाई पालिकेकडून करत टॉवर काढून टाकला जाईल. आपण जनतेसोबत राहणार असून पदाची मला किंमत नाही. प्रसंगी राजीनामा देईन असं मत नगरसेवक नासिर शेख यांनी व्यक्त केले. यावेळी जाहीदा जरीना खान, मुबारक खान आदी उपस्थित होते.
