पालकमंत्री उदय सामंत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०५-:* उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे दिनांक 6 मार्च 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. सकाळी 6.40 वा. दाभोळी विमानतळ, गोवा येथून शासकीय विश्रामगृह, सिंधुदुर्गनगरी, ओरोसकडे प्रयाण, सकाळी 9.30 वा. शासकीय विश्रामगृह, ओरोस येथे आगमन व राखीव, सकाळी 11.30 वा. शासकीय विश्रामगृह ओरोस येथून मोटारीने मसुरे – आंगणेवाडी, ता. मालवण कडे प्रयाण, दुपारी 12.30 वा. मौजे देऊळवाडा, धरणस्थळ, दत्त मंदिर जवळ, मसुरे, आंगणेवाडी ता. मालवण येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते ऑनलाईनच्या माध्यमातून होणाऱ्या मृद व जलसंधारण विभाग अंतर्गत लघु पाटबंधारे योजना मसुरे- आंगणेवाडी व लघु पाटबंधारे योजना कुंभवडे, ता. कणकवली भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 1.00 वा. मसुरे – आंगणेवाडी येथून मोटारीने मालोंड-मालडी (पाणवठा), ता. मालवणकडे प्रयाण, दुपारी 1.30 वा. मालोंड-मालडी (पाणवठा), ता. मालवण येथे कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 2.00 वा. मालोंड – मालडी (पाणवठा) ता. मालवण येथून मोटारीने कुडाळकडे प्रयाण, दुपारी 3.00 वा. एम.आय.डी.सी. विश्रामगृह, कुडाळ येथे राखीव, दुपारी 3.30 वा. एम.आय.डी.सी. विश्रामगृह, कुडाळ येथे कुडाळ शहर शिवसेना पदाधिकारी बैठक, दुपारी 4.45 वा. एम.आय.डी.सी. विश्रामगृह, कुडाळ येथे महाविकास आघाडी समन्वय समितीची बैठक, सायंकाळी 5.30 वा. कुडाळ येथून मोटारीने रत्नागिरीकडे प्रयाण.

You cannot copy content of this page