सर्वसाधारण सभेत होणार नियुक्ती
*💫कणकवली दि.०५-:* कणकवली तालुका पत्रकार संघाची मंगळवारी दि.९ मार्च २०२१ रोजी सकाळी ११ वाजता सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे.ही सभा कणकवली मातोश्री मंगल कार्यालय येथे होणार आहे. या सभेत पुढील कार्यकालासाठी कणकवली तालुका पत्रकार संघाची कार्यकारिणी निवडण्यात येणार आहे. एकनाथ पवार, उज्ज्वल नारकर, संतोष सावंत निवड निरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. सर्व सभासदांनी उपस्थित रहावे,असे आवाहन जिल्हा पत्रकार संघाने दिलेल्या पत्रानुसार तालुकाध्यक्ष भगवान लोके, सचिव नितीन सावंत,खजिनदार माणिक सावंत व कार्यकारी मंडळाने केले आहे. ही सभा कोविड १९ बाबत सर्व नियम पाळून घेण्यात येणार आहे.
