“त्या” रस्त्याचे भाजप कडून पुन्हा एकदा भूमिपूजन

सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन

*💫सावंतवाडी दि.०५-:* माजगाव-खोतवाडी खोर्जुवेकर घर ते सात सावंत घर हा रस्ता नागरी सुविधा अंतर्गत मंजूर झाला आहे. या रस्त्याचे भुमिपूजन आज पुन्हा एकदा भाजपच्या वतीने सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रेश्मा सावंत, पंचायत समिती सदस्य बाबू सावंत आदी उपस्थित होते. काही दिवसांपूर्वीच शिवसेना उपजिल्हा प्रमुख अशोक दळवी हे शिवसेनेच्या माध्यमातून या रस्त्याचे भूमिपूजन करत होते. परंतु पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण उर्फ बाबू सावंत यांनी ते उधळून लावले होते. तसेच यावेळी जिल्हा नियोजन निधी मधून मंजूर झालेल्या माजगाव देऊळवाडा पुलाचे उद्घाटन देखील करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page