मडुऱ्यात शेतकर्‍यावर मगरीचा जीवघेणा हल्ला…

*💫बांदा दि.०५-:* मडुरा रेडकरवाडी येथील नदीपात्रात राजन यशवंत पंडीत (४५) या शेतकर्‍यावर मगरीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली. राजन पंडीत हे पाण्याच्या इंजिनचा पाईप नदीपात्रात ठेवत असताना मगरीने अचानक हल्ला केला. मगरीने त्यांचा हात पकडला. त्यांनी प्रसंगावधान राखत हात झिडकारुन नदीबाहेर पळाल्याने बालंबाल बचावले. त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले आहे. मडूरा परिसरात मगरींनी गुरांवर हल्ले करण्याचे बरेच प्रकार आतापर्यंत घडले आहेत. मात्र मनुष्यांवर हल्ला केल्याने परिसरात घबराट पसरली आहे. वनविभागाने मगरींचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

You cannot copy content of this page