पंचायत समिती आपल्या दारी उपक्रमाचे राजन तेली यांच्याकडून कौतुक

सभापती रवी पाळेकर यांना दिल्या शुभेच्छा

*💫देवगड दि०४-:* देवगड पंचायत समिती येथे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजनभाई तेली यांनी सभापती रवी पाळेकर यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या व पंचायत समिती आपल्या दारी या आमदार नितेशजी राणेंच्या मार्गदर्शनाखाली राबवत असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी वेगवेगळ्या विकास कामांवर चर्चा करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे बाळू कुबल एडवोकेट प्रकाश बोडस युवा मोर्चा अध्यक्ष तम बिर्जे विजयदुर्ग सरपंच प्रसाद देवधर प्रमोद आंबेरकर व इतर मान्यवर उपस्थित होते

You cannot copy content of this page