कोरोना नियमलवलीचे पालन करून सोहळा साजरा
*💫सावंतवाडी दि.०३सहदेव राऊळ-:* मळगाव माळीचे घर येथील श्री देव घरवडकर देवाचा वार्षिक श्रीफळ पुनप्रतिष्ठापना सोहळा आज कोरोना नियमलवली व सोशल डिस्टनसिंगचे पालन करून उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम, दुपारी ब्राम्हणांच्या साक्षीने होमहवन, श्रीफळ पुनप्रतिष्ठापना त्यानंतर महाप्रसाद आदी कार्यक्रम पार पडले. सायंकाळी सत्यनारायण महापूजा, आरती, तीर्थप्रसाद, महाप्रसाद आदी कार्यक्रम झाले. त्यानंतर तेलकटा वाडीतील महिला मंडळाने फुगडी सादर केली. त्यानंतर भजने सादर करण्यात आली. यात मुळपुरुष प्रासादिक भजन मंडळ, वडखोल ता. वेंगुर्ला (बुवा पुरुषोत्तम परब), विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळ, मळगाव-कुडववाडी (बुवा-दिनेश कुडव), महापुरुष प्रासादिक भजन मंडळ, मळगाव-सुतारवाडी (बुवा सिध्देश सावंत), श्री सद्गुरु साटम महाराज प्रासादिक भजन मंडळ निरवडे-झरबाजार (बुवा-नरेंद्र बोंद्रे) आदी भजन मंडळांनी आपली भजने सादर केली. या सोहळ्यात माळीच्या घरातील थोर व्यक्तींसहीत, महिला व लहान मुले सहभागी झाली होती. मळगाव परिसरातील लोकांनी या पुनप्रतिष्ठापना सोहळ्यास उपस्थित राहून कोरोना नियमावली व सोशल डिस्टन्सचे पालन करून या सर्व कार्यक्रमांचा, महाप्रसादाचा व भजनाचा लाभ घेतला .
