*तारकर्ली एमटीडीसी पर्यटन केंद्राच्या गझिबोतून पर्यटकाचा मोबाईल चोरीस*

*💫मालवण दि.०४-:* तारकर्ली येथील एमटीडीसीच्या पर्यटन केंद्राच्या गझिबोतून मालेगाव नाशिक येथील एका पर्यटकाचा मोबाईल चोरीस गेल्याची घटना काल रात्री घडली. याबाबतची तक्रार त्या पर्यटकाने येथील पोलिस ठाण्यात दिली आहे. मालेगाव नाशिक येथून आलेला एक पर्यटक आपला मोबाईल पर्यटन केंद्राच्या गझिबोमध्ये विसरला. त्याने पुन्हा तेथे जाऊन मोबाईल शोधण्याचा प्रयत्न केला असता तो चोरीस गेल्याचे दिसून आले. त्यामुळे त्या पर्यटकाने याबाबतची तक्रार पोलिस ठाण्यात दिली आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

You cannot copy content of this page