*💫मालवण दि.०४-:* मालवण बंदर जेटीनजीक पार्क करून ठेवलेली दुचाकी अज्ञाताने चोरल्याची घटना बुधवारी संध्याकाळी घडली. याबाबत दुचाकी मालक सुशांत शेलटकर यांनी मालवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञाताविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. मालवण बंदरजेटी नजीक सुशांत शेलटकर (रा. दांडी) यांनी दुचाकी (एमएच ०७ एएफ ९६०३) पार्क करून ठेवत समुद्रस्नानाचा आनंद लुटण्यासाठी गेले. त्या दुचाकीची चावी काढण्यास ते विसरले तसेच दुचाकीच्या ‘डिकी’मध्ये त्यांचा मोबाईल राहिला होता. शेलटकर हे समुद्र स्नानासाठी गेले असताना वर्दळीच्या ठिकाणाहून अज्ञाताने दुचाकी चोरल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी शेलटकर यांनी बुधवारी रात्री पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार दुचाकीमध्ये राहिलेल्या मोबाईलद्वारे ‘लोकेशन’च्या आधारे पोलीस तपास करत आहेत. प्राप्त लोकेशननुसार मालवण पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.
मालवण येथून दुचाकी चोरीला….
