कोकण हायवेचा अभ्यास अहवाल केला सुपूर्द
*💫मालवण दि.०४-:* कोकण हायवे संदर्भात केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची कोकण हायवे समन्वय समितीचे संजय यादवराव, ग्लोबल कोकण चे संचालक किशोर धारिया, सिंधुदुर्गचे उद्योजक दीपक परब आदींच्या शिष्टमंडळाने दिल्ली येथे जाऊन भेट घेत कोकण हायवेचा अभ्यास अहवाल ना.गडकरी यांना सुपूर्द करून त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. दरम्यान, ना. गडकरी यांनी कोकण हायवे समन्वय समितीने जो अहवाल दिला त्यातील सर्व मुद्द्यांचा अभ्यास करण्या करता अधिकार्यांची एक टीम कोकणात येऊन सर्व गोष्टी प्रत्यक्ष पाहिल व यात जे जे शक्य आहे ते सर्व केले जाईल असे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती संजय यादवराव यांनी दिली कोकण हायवे संदर्भात केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची कोकण हायवे समन्वय समितीने भेट घेतली यावेळी हायवे समितीच्या माध्यमातून राज्याचे मुख्य सचिव दम सुकथनकर यांच्या मार्गदर्शनाखाली समितीचे तज्ञ मंडळ यशवंत पंडित यांच्या समन्वयातून, मंगेश नेने, संतोष ठाकूर, प्रसाद पटवर्धन, युयुत्सु आर्ते, जगदीश ठोसर, व अन्य कार्यकर्त्यांच्या मदतीने बनवलेला कोकण हायवेचा अभ्यास अहवाल गडकरी यांना सुपूर्द केला या हायवेवर अनेक अडचणी आहेत , अपघात होतील अशी अनेक धोकादायक ठिकाणे आणि वळणे आहेत. अनेक नाक्यावर भरपूर ट्राफिक आहे पण सर्विस रोड किंवा वाहने पलीकडे जाण्यासाठी अंडरपास नाहीत, पळस्पे ते इंदापूर ८५ किलो मीटर चे काम आणि त्यापुढील आरवली ते वाकड हे जवळपास ९० किलोमीटरचे काम अतिशय अपूर्ण स्थितीत आहेत या सर्व मुद्द्यांची चर्चा केली. देशाचे माजी उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी या अहवालासंदर्भात या अगोदर नितीन गडकरी यांच्याबरोबर चर्चा केली होती समितीच्या सर्व सूचनांचे नितीन गडकरी यांनी स्वागत केले.यावेळी सकारात्मक चर्चा झाली कोकण हायवे अधिकाधिक दर्जेदार व्हावा यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्याचे कोकण हायवे समन्वय समितीने ठरवले आहे. यासंदर्भात आपण राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांना येत्या कालावधीत भेटणार घेणार असल्याचे संजय यादवराव यांनी सांगितले यावेळी कोकणची सर्वात अनमोल भेट हापूस आंबा आणि आंबा बागायतदारांचा आंतरराष्ट्रीय ब्रँड मायको हापुस या आंब्याची एक पेटी शिष्टमंडळाच्या वतीने ना. गडकरी यांना भेट देण्यात आली
