विद्यार्थ्यांनो अधिकारी बना:गिल्बर्ट फर्नांडिस

धनंजय फाउंडेशन तर्फे शिष्यवृत्ती परीक्षेतील यशवंतांच गुणगौरव..

⚡कणकवली ता.१३-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांमध्ये टॅलेंटची कमतरता नाही. त्यांना शिक्षण विषयक व करिअर मार्गदर्शनाची गरज आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांना सामोरे जावून उज्ज्वल यश संपादन करून अधिकारी बनले पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे नेते गिल्बर्ट फर्नाडिस यांनी केले.

धनंजय फाऊंडेशनतर्फे विविध परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्याथ्यांचा गुणगौरव कणकवली येथे आयोजित केला होता. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अजित बिडये, शिक्षिका कल्पना मलये, पत्रकार सुधीर राणे, अनिकेत उचले, शिक्षक प्रदीप मांजेरकर,शिक्षिका श्रीमती सारिका बाणे,श्रीमती सोनल चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. फर्नांडिस म्हणाले, विविध क्षेत्रात करिअर करण्याची संधी उपलब्ध आहे. या संधीचा लाभ विद्यार्थ्यांनी घेत आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर केले पाहिजे. जिल्ह्यातील विद्यार्थी शिष्यवृत्ती, दहावी, बारावीच्या परीक्षेत अव्वल स्थानी असतात. मात्र, स्पर्धा परीक्षांमध्ये जिल्ह्यातील विद्यार्थी टॉपलिस्टमध्ये असण्याचे प्रमाण खूप कमी असून विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांना सामोरे जावून चांगले अधिकारी व नागरिक बनावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली..

विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे, तेव्हा तुम्ही यशाला गवसणी घालू शकतात, असे कल्पना मलये यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी आपल्या यशात सातत्य ठेवून पुढील शिक्षण घ्यावे, असे आवाहन सुधीर राणे यांनी केले. गरीबीच्या परिस्थित मी शिक्षण घेतले, त्यामुळे मला शिक्षणाचे मोल कळले असून मला शिक्षण घेण्यासाठी वेळोवेगळी धनंजय फाऊंडेशनने प्रोत्साहन दिले, असे अनिकेत उचले यांनी सांगितले. प्रास्ताविक प्रदीप मांजरेकर यांनी केले. यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात प्रथम व राज्यात सातव्या आलेल्या अनोन्य तांबे, वेद आर्लेकर, पार्थ राणे, श्रावणी सामंत, अनुज घुणे, हर्षिता सावंत, मैत्री पवार, आदित्य वणवे, प्रवण पाटकर, दर्शिल सापळे, रिया राणे, देवश्री कणसे, प्रवण गवळी, निहीर सावंत, ओवी आकनुरकर, मैत्रेत्री हिर्लेकर, आर्या राणे, मनस्वी पिळणकर, मयंका चव्हाण, विश्वजित सातोसे, अनामय खांडेकर, रुद्र मुसळे, कतृत्वा हरकुळकर, दुर्वा मुसळे, सोहम मर्गज, विवेक पाटील, मयुरेश सोर्नुलेकर, आदिती पवार, श्रेया रावराणे, गौतमी चव्हाण, प्रतीक शिरसाट, सुकन्या राणे यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करत शिक्षकांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.

l

You cannot copy content of this page