फाळणी दिनाच्या निषेधार्थ सावंतवाडीत भाजपकडून मुक मोर्चा

⚡सावंतवाडी ता.१३-: भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून 14 ऑगस्ट हा दिन देशभरात फाळणी दिवस म्हणून पाळला जाणार आहे. फाळणीच्या जखमांचा स्मरण दिवस म्हणून हा दिवस पाळण्यात येणार आहे याच पार्श्वभूमीवर आज सावंतवाडी शहरातून भाजपाच्या माध्यमातून
मूक मोर्चा काढण्यात आला.


तर देशाची फाळणी कशी भयावह ठरली आणि त्याचा परिणाम आजही दिसून येतो हे लक्षात ठेवण्यासाठी हा दिवस पाळला जाणार आहे असे यावेळी माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी बोलताना सांगितले.
सावंतवाडी शहरात रविवारी सकाळी भाजप कार्यालय ते गांधी चौक पर्यंत या मुक मोर्चाच आयोजन करण्यात आल होत. माजी आमदार राजन तेली, माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते या मुक मोर्चात सहभागी झाले होते.


देशासाठी सर्वस्व अर्पण केलेल्या लाखो भारतीयांच्या संघर्ष व बलिदानाचे स्मरण करण्यासाठी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येस, १४ ऑगस्ट रोजी ‘विभाजन विभीषिका स्मृती दिवस’ पाळण्याचा संकल्प भारतीय जनता पार्टीने सोडला आहे. देशाचे विभाजन झाल्यामुळे झालेल्या वेदनांचे स्मरण ठेवण्यासाठी तसेच फाळणीच्या वेळी ज्यांनी प्राण गमावले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जात आहे. तर अखंड भारताच्या झालेल्या फाळणीच्या निषेधार्थ हा मुकमोर्चा काढण्यात आला असल्याच माजी आमदार राजन तेली म्हणाले. तर दीडशे वर्षांच्या ब्रिटीश गुलामगिरीतून मुक्त होऊन प्राप्त झालेल्या स्वातंत्र्याचा यंदाचा अमृत महोत्सव हा प्रत्येक नागरिकाच्या दृष्टीने अभिमानाचा सोहळा आहे. ब्रिटिशांनी फाळणी करुन भारत आणि पाकिस्तान असे दोन देश निर्माण करून अखंड भारताच्या नकाशाला छेद दिला. ही कृती कधीच विसरता येणार नाही असं मत भाजप प्रवक्ते संजू परब यांनी व्यक्त केल.
याप्रसंगी भाजप मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, महेश धुरी, रविंद्र मडगावकर, प्रमोद कामत, श्वेतल कोरगावकर, प्रियांका नाईक, शर्वरी धारगळकर, आरती माळकर, दिपाली भालेकर, मानसी धुरी, दिलीप भालेकर, जावेद खतीब, गुरुनाथ पेडणेकर, हनुमंत पेडणेकर, बंटी पुरोहित, केतन आजगावकर, गुरु मठकर, दादु कविटकर, पंकज पेडणेकर, संजय वरेरकर, सत्या बांदेकर, क्लेटस फर्नांडिस आदि भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page