⚡मालवण ता.१३-: युवती सेनेच्या दांडी उपशाखा प्रमुखपदी ज्योती तोडणकर, तन्वी भगत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुडाळ-मालवण विधानसभा समन्वयक शिल्पा खोत यांनी ही नियुक्ती जाहीर केली.
यावेळी तालुका प्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी, यतीन खोत, युवा तालुका समन्वयक मंदार ओरसकर, गणेश कुडाळकर, नरेश हुले, उपशहर प्रमुख उमेश चव्हाण, गौरव वेर्लेकर, महिला तालुका प्रमुख दीपा शिंदे, नंदा सारंग, श्रीमती पवार, शांती तोंडवळकर, साक्षी मयेकर, युवती सेना तालुका प्रमुख निनाक्षी शिंदे, शाखाप्रमुख पवार आदी उपस्थित होत्या.
