आस्था ग्रुपच्या देशभक्तीपर समूहगान स्पर्धेत टोपीवाला प्राथमिक शाळा प्रथम…*

⚡मालवण ता.१-: आस्था ग्रुप मालवणच्यावतीने घेण्यात आलेल्या देशभक्तीपर समुहगान स्पर्धेत प्राथमिक गटात मोहनराव परूळेकर प्राथमिक शाळेने, माध्यमिक गटात रेकोबा हायस्कूलने तर महाविद्यालयीन गटात टोपीवाला ज्युनिअर कॉलेज संघाने प्रथम क्रमांक पटकाविला.

मालवण तालुकास्तरीय देशभक्तीपर समुहगान स्पर्धेत तालुक्यातील २३ शाळांना सहभाग दर्शविला होता. यात या स्पर्धेत प्राथमिक गटात भंडारी प्राथमिक शाळा मालवण,
प्राथमिक कन्याशाळा मालवण, जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल मालवण, मोहनराव परुळेकर प्राथमिक शाळा मालवण तर माध्यमिक गटात माध्यमिक गट वराडकर हायस्कूल कट्टा, केंद्र शाळा मसुरे, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, दांडी, शिवाजी विद्यामंदिर काळसे, माध्यमिक कन्याशाळा, टोपीवाला हायस्कूल मालवण, जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल मालवण, डॉ. दत्ता सामंत स्कूल, देवबाग, भंडारी हायस्कूल मालवण, ओझर विद्यामंदिर कांदळगाव, रेकोबा माध्यमिक विद्यालय, वायरी अशा शाळांचा सहभाग होता. ही स्पर्धा प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन अशा तीन गटात घेण्यात आली. सुत्रसंचालन सौगंधराज बादेकर यांनी केले.
रेवतळे येथील प्राथमिक शाळेत ही स्पर्धा घेण्यात आली. सायंकाळी उशीरा स्पर्धेचे पारिताषिक वितरण ग्रुपचे अध्यक्ष उमेश मांजरेकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पुरस्कर्ते अंबिका कॉम्प्युटरचे विद्याधर केनवडेकर, रेवतळे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी देशमुख, महादेव घोडके, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश शिरोडकर, हरी चव्हाण, सौगंधराज बादेकर, निनाद बादेकर, प्रशांत हिंदळेकर, आगोस्तीन डिसोझा, मनोज चव्हाण, बंटी चव्हाण, रवी मिटकर, पी. के. चौकेकर, परीक्षक रविना पांजरी, संजय शिंदे, शुभम लुडबे, उमेश शिरोडकर तसेच इतर उपस्थित होते.
स्पर्धेचा उर्वरित निकाल असा- प्राथमिक विभाग – द्वितीय – भंडारी प्राथमिक शाळा, तृतीय – जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूल. माध्यमिक विभाग द्वितीय – टोपीवाला माध्यमिक शाळा, तृतीय- वराडकर हायस्कूल कट्टा, उत्तेजनार्थ प्रथम- भंडारी हायस्कूल, द्वितीय- मसुरे शाळा नं. १. महाविद्यालयीन विभाग द्वितीय – वराडकर ज्युनिअर कॉलेज कट्टा, तृतीय – भंडारी ज्युनिअर कॉलेज. विजेत्यांना पहिल्या गटासाठी ५०१ व ३०१ रुपये, दुसऱ्या गटासाठी २००१ व १००१ रुपये, तिसऱ्या गटासाठी ३००१ व २००१ रुपये तसेच सर्व गटांसाठी चषक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

फोटो
मालवण येथील आस्था ग्रुपच्या वतीने आयोजित स्पर्धेतील महाविद्यालयीन गटातील विजेत्या संघास मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

You cannot copy content of this page