⚡कणकवली ता.११-: ग्रामपंचायत हुंबरट येथे “मेरी मिट्टी मेरा देश” या भारताच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमाच्या धर्तीवर ध्वजारोहन कार्यक्रम साजरा करण्यात आला.
त्या नंतर शिलाफलकाचे लोकार्पण / अनावरण सरपंच श्रीम. मनीषा गुरव यांच्या हस्ते करण्यात आले. गावातील माजी सैनिक उत्तम दळवी, व कै. शिवाजी परब यांचा मुलगा यांना ग्रामपंचायती मार्फत गौरविण्यात आले.तसेच वसुधा पूजन निमित्ताने आपल्या गावातील दोन्ही पावणादेवी मंदिराच्या परिसरात देशी वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी गावातील ग्रामस्थांच्या सहभागातून या वृक्षांची लागवड करणेत आली.त्यानंतर २ ते ४ मूठ, माती ग्रामपंचायत ठिकाणा जवळची सन्मानपूर्वक घेण्यात आली.या कार्यक्रमासाठी
सरपंच श्रीमती मनीषा मनोहर गुरव, उपसरपंच संदीप राजाराम होळकर, सदस्य नितीन हरिश्चंद्र बागवे, सदस्य सुचिता सुहास दळवी, सौ.रिया राजेंद्र पांचाळ, सौ. प्रेरणा भिकाजी दळवी, सौ. शरिफा सईद काझी, ग्रामसेवक वैभव वसंत ठाकूर, मुंबई मंडळ कार्यकर्ते मंगेश दळवी, गावातील सर्व शासकीय / निमशासकिय कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग तसेच आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, सी आर पी, व महिला बचत गटातील महिला उपस्थित सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
